मी अनेक वाटांवरून प्रवास केला, तो करताना ‘रस्ते’ जरी बदलले, तरी ‘दिशा’ मात्र कधी बदलली नाही!
माझी सामाजिक, राजकीय वाटचाल खूप वेगळी आहे. राष्ट्र सेवादल ही माझ्या आयुष्यातील पहिली संघटना. दुसरी संघटना ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’, एकदम डाव्या विचारांची, कम्युनिस्टांच्या जवळ असणारी… त्यानंतर आणीबाणीच्या काळातील विद्यार्थी संघटना, या सगळ्यातून मी जरी घडत गेलो, तरी मला जाणवतं की, या प्रत्येकाचा मूळ जो स्तर आहे, तो सेवादलानेच विणलेला आहे, तिथंच तयार झालेला आहे.......